Posts

वडसात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

देसाईगंज : उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत २०१७-१८ वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून तालुक्यातील वडधा येथील शेतकरी आसाराम लक्ष्मण बाळबुद्धे, अरूण मोहन गायकवाड, काशिनाथ दिनू गायकवाड व इतर शेतकऱ्यांना अनुदानावर आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, तालुका कृषी अधिकारी अभिजीत धेटे आदी उपस्थित होते. उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये देसाईगंज तालुक्यातील एकूण १०८ शेतकऱ्यांनी विविध अवजारे अनुदानावर मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केले. सर्व शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. सर्व शेतकऱ्यांना अवजारे मंजूर करून खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. यापैकी अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना आमदारांच्या हस्ते गुरूवारी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. सदर योजनेचा देसाईगंज तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजीत धेडे यांनी केले आहे. शेतकºयांनी शेतीपयोगी कामासाठी शासकीय योजनेचा लाभ घेऊन विविध अवजारे अनुदानावर मिळवावेत, या

गडचिरोलीत प्रबोधन दिंडीतून युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांची जागृती

धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणाऱ्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी गडचिरोली आणि धानोरा येथे महाविद्यालयीन युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत जागृती करणारी प्रबोधन दिंडी काढण्यात आली. गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणाऱ्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी गडचिरोली आणि धानोरा येथे महाविद्यालयीन युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत जागृती करणारी प्रबोधन दिंडी काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी वैचारिक जडणघडणीसाठी युवकांनी या संमेलनाला आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन केले. पूजेच्या माध्यमातून मानसिक विकार दूर होतात. मात्र काही नागरिक पूजेचा वापर अंधश्रद्धा पसरविण्यासाठी करतात. अशा भोंदंपासून सावध राहावे, असे आवाहन गडचिरोली येथील महिला महाविद्यालयात बोलताना रक्षक यांनी केले. रविवार दि.२८ जानेवारी रोजी मेंढा-लेखा येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनाला युवा विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिकाधिक राहावी, या उद्देशाने ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या दारी’ या उ